UPSC बद्दलच्या काही दंतकथा
Today I have decided to write this particular article in Marathi only because I think there is a plenty of material related to this topic already available in English but not in Marathi. And whatever is available is not up to the mark.So bear with me on this one. (Off Course translated version will be soon posted).
हा लेख जरी UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) ला डोळ्यासमोर ठेऊन लिहिला आहे तरी पण यातील मुद्दे मात्र सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी असेच आहे.
काही दिवसांपूर्वी एका विध्यार्थ्याला भेटायला म्हणून गेलो.नुकताच १२वि पास झालेला हा मुलगा पुढे काय करावे ह्या विचारात होता व त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी म्हणून मी त्याच्याकडे गेलो होतो.परंतु हा लेख त्याबद्दल नसून त्याच्या लहान भावाबद्दल आहे.(तोहि माझाच विद्यार्थी व नुकताच १०वि ची परीक्षा दिलेला)
वडिलांनी बोलताना सहज सांगितलं कि हा मोठा खूप Confused आहे परंतु छोट्याने आधीच सर्वच ठरवले आहे आणि त्याने १० वि च्या सुट्टीतच MPSC चा अभ्यास सुरु केलेला आहे.
मला नवल वाटलं आणि चांगलंही, कारण महाराष्ट्र मध्ये स्पर्धापरीक्षा बद्दल आवड निर्माण व्हायला व एक करियर म्हणून त्याकडे बघायला तसा जरा उशीरच झाला.आणि आता जरा कुठे जागृती होत असतांनाच बऱ्याच अफवा किंवा दंतकथा पसरवल्या जात आहे.मी त्याला काय वाचतोस म्हणून विचारलं तर त्याने मला MPSC च्या तयारीचा प्रश्नपत्रिका संच आणून दाखविला व ह्या नंतर मात्र मला दु:ख झाले.इतक्या उत्साहाने तयारीला सुरुवात करणारा हा मुलगा अश्या चुकीच्या गोष्टींमुळे उद्या हे क्षेत्र सोडून देईल व त्याचा मनात स्पर्धा परीक्षाबाबत एक आकस निर्माण होईल. म्हणून ह्या लेखात मी स्पर्धा परीक्षांबाबत पसरलेल्या काही अफवांचे स्पष्टीकरण देत आहे.
१) MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) सोपी व UPSC(केंद्रीय लोकसेवा आयोग) त्यापेक्षा अवघड असते.
बहुतेक जणांचा हा खूप मोठा गैरसमज आहे कि UPSC हि MPSC पेक्षा अवघड आहे व म्हणून आपण पहिले MPSC च्या अभ्यास करू व पास झालो तर UPSC ची तयारी करू.असे काहीही नाही दोन्ही वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्यांचे स्वरूपहि वेगळे आहे.याउलट असे अनेक उदाहरणे आहेत कि ज्यांनी UPSC तर पास केली व IAS हि झाले परंतु MPSC ची पूर्व परीक्षाहि पास करू शकले नाही.म्हणून असे कोणतेच पूर्वग्रह न बाळगता अभ्यासाला सुरुवात करा
२) कुठलीही स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी Coaching Class लावावा लागतो आणि पुणे/दिल्ली/लातूर/कोटा ला जाणे अपरिहार्य आहे.
![]() |
इतकि भरमसाठ फी देऊनही क्लासेस केल्याने यश मिळेलच असे नाही |
क्लासेस ची काहीच गरज नाही सगळे काही घरी करता येते असे टोकाचे उत्तर मी देणार नाही कारण ते प्रामाणिक होणार नाही.प्रथम आपण हा प्रश्न समजून घेऊ कारण A Problem well defined is half solved तर काही वर्षांपूर्वी कुणालाही योग्य मार्गदर्शन हवं असल्यास क्लास लावणे व पुणे/दिल्ली ला जाणे गरजेचे होते.चांगले क्लासेस आपल्याला अभ्यासाची दिशा देतात.परंतु आता त्याच क्लासेस ची दुसरी बाजू म्हणजे आज कोचिंग क्लास हा व्यवसाय झालेला आहे व Quantity वाढवण्यासाठी Quality कडे दुर्लक्ष होत आहे.एका चांगल्या शिक्षकाने सुरु केलेला क्लास अनेक शहरांमध्ये शाखा उघडतो परंतु शिक्षक मात्र बदलेले आहेत.अश्या गोष्टींमुळे यश तर मिळत नाहीच परंतु आर्थिक व मानसिक त्रास होतो तो वेगळाच ह्यावर उपाय एकच आज सर्वांकडेच एक Smart Phone किंवा Computer असतेच आणि सर्वच विषयांसाठी Online Coaching अगदी मोफत उपलब्ध आहे.कितीही चांगला क्लास असो सर्वच शिक्षक सर्वच विषयात तज्ञ असतील असे नाही.सर्व तज्ञ शिक्षक एकाच ठिकाणी भेटू शकतील ते म्हणजे मायाजाल (इंटरनेट).ह्या लेखाच्या शेवटी काही Online Coaching Platform ची यादी देत आहे.
३) इंग्लिश येत नसेल तर स्पर्धा परीक्षा देता येत नाही/इंग्लिश उत्तम येणे आवश्यक आहे.
अगदीच इंग्लिश न येऊन चालणार नाही कारण सर्वच स्पर्धा परीक्षा ह्या राष्ट्रीय पातळीच्या असल्या कारणाने योग्य पुस्तके व अभ्यास साहित्य हे इंग्लिश मध्ये उपलब्ध आहे.तसे अनेक पुस्तकांचे अनुवाद मराठीत झालेले आहेत परंतु मूळ पुस्तक कधीही अधिक चांगले म्हणून जुजबी इंग्लिश माहित असायला हवीच.परंतु म्हणून तुम्ही अगदी Convent मध्येच शिकण्याची गरज नाही.परीक्षा पूर्णपणे मराठीमधूनहि देता येते.व तसे करून अनेकांनी उत्तम रँँक मिळवलेली हि आहे.
४) परीक्षा खूप अवघड असल्याने १४ ते १६ तास अभ्यास करावा लागतो.
मी नेहमी एक वाक्य सांगत असतो People fail in Exam because they study.(लोक परीक्षेमध्ये नापास होतात कारण ते अभ्यास करतात)....हो हे अगदी खरे आहे पण हे वाक्य इथेच संपत नाही त्यापुढी आहे People fail in Exam because they study,but don't study for exam (लोक परीक्षेमध्ये नापास होतात कारण ते अभ्यास करतात परंतु परीक्षेसाठी अभ्यास करत नाही.) नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा 'परमाणु' यामधील एक वाक्य ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर ठरेल."IAS कि पढाई समय देख कर नही, Syllabus देखकर होती है." आणि किती वेळ करतो ह्यापेक्षा कसा करतो ह्याला फार महत्व आहे.
५)अश्या परीक्षेंचा अभ्यास करण्यासाठी सर्वच गोष्टी सोडून फक्त अभ्यास एके अभ्यास करावा लागतो.त्यामुळे सिनेमा,नाटक,गाणे,फोन ई. सर्वच गोष्टी सोडून द्याव्या लागतात.
कुठ्लाय्ही परीक्षेचा अभ्यास हि एक मोठी प्रक्रिया आहे (किमान १ वर्ष) व अश्या सर्व गोष्टी सोडून दिल्यामुळे कार्यक्षमता वाढण्याऐवजी कमी होते.ह्या उलट ह्या सर्वच गोष्टींचा अभ्यासाठी योग्य वापर केला जाऊ शकतो.उदा.श्याम बेनेगल दिग्दर्शित 'भारत एक खोज' व 'संविधान' ह्या मालिकेतून तुमच्या इतिहासाचा व राज्यशास्त्राचा अभ्यास होतो.तसेच अनुपम खेर यांची 'भारतवर्ष' शेखर कपूर यांची 'प्रधानमंत्री'.अमीर खान ची 'सत्यमेव जयते' ,Grey's Anatomy यांसारख्या मालिका व Schindler's List,Anthropoid,Zero Dark Thirty,Operation Thunderbolt,A Few Good Men,The Man Who Knew Infinity यांसारख्या अनेक चित्रपटांतून अभ्यास होतो परंतु हा तयारी कशी करायची याचा भाग आहे याबद्दल पुन्हा कधीतरी बोलू.
जगातील सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक Albert Einstein हे एक उत्तम Violin वादक होते व त्यांना संगीत त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करायचे.भारतरत्न डॉ.ए.पी.जी.अब्दुल कलाम सर हे रुद्र वीणा वाजवत.त्यामुळे ह्या सर्व गोष्टी सोडून देण्याऐवजी त्याचा अभ्यासाठी उपयोग करून घ्यावा.
अजूनही बऱ्याच अफवा समाजात आहे.आणि ते पसवणारे हे बहुतेक वेळा याच्याशी काहीही संबंध नसणारे लोक असतात, जे खरंच तयारी करता आहेत त्यांच्याकडे अश्या गोष्टींसाठी वेळ नाहीच.म्हणून कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेऊ नका, माझ्याही नाही कारण...कृष्ण अर्जुनालाही सांगतो कि 'मी जे सांगितले ते परम सत्य असूनही तू त्यावर विश्वास ठेऊ नको स्वतंत्र बुद्धीने विचार कर' कृष्णाला माहित आहे कि सरतेशेवट अर्जुन ह्याच सत्यापर्यंत पोहोचणार आहे तरीही स्वतंत्र बुद्धीचा आग्रह आहेच.तोच आग्रह असावा......
Some Online Study Platform
1) Unacademy
2) Vision IAS
3) Chankya Mandal Pariwar
4) Insight IAS
5) IAS Forum
6) Byju's
7) Crash Course by John Green
8) Khan Academy
9) Civilsdaily
10) Mrunal.org
If any more doubts and question ask in comment below.Will be happy to reply
Comments
Post a Comment